Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

एसआरपीएफ मधून राज्य पोलिस दलात बदलीची अट शिथील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय

मुंबई । वीरभूमी- May 12, 2021 • 12:00 AM 1711 views
मुंबई राज्य राखीव पोलिस बलातून (एसआरपीएफ मधून) राज्य पोलिस दलात बदलीसाठी असलेल्या अटीमध्ये राज्य शासनाने बदल केला आहे. यामध्ये बदलीसाठी आवश्यक असलेल्या सेवेची 15 वर्षाची अट शिथील करण्यात आली आहे. ती अट आता 12 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

या निर्णयामुळे राज्य राखीव बलातून राज्य पोलिस दलात येणार्‍या इच्छुकांचा मार्ग मोकळा होणार असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

दिवसेंदिवस राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा वाढता कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची 15 वर्षांची अट शिथील करून 12 वर्षे करण्याचा व प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

तसेच राज्य राखीव पोलिस बलातून राज्य पोलिस दलात बदली झाल्यानंतर पहिली 5 वर्षे जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजवावे लागत होते. या अटीमध्येही शिथीलता आणली असून यापुढे बदली नंतर जिल्हा पोलिस दलात 2 वर्षे कर्तव्य बजवावे लागणार आहे. यानिर्णयामुळे राज्य पोलिस दलात मनुष्यबळ वाढून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply