Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांबरोबरच चिंता वाढली

संगमनेर 449, अकोले 388, पारनेर 233, शेवगाव 157, पाथर्डी 158

अहमदनगर । वीरभूमी - May 14, 2021 • 12:00 AM 2998 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज पुन्हा वाढली असून त्याबरोबरच जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यातील रुग्ण संख्येत 3494 बाधितांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये दोन दिवस घट झाल्यानंतर काल तिसर्‍या दिवशी अल्पशी वाढ झाली तर आज शुक्रवारी पुन्हा 850 ने वाढ झाली आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक संगमनेर तालुक्यात आढळले असून त्या खालोखाल अकोले, राहुरी, नगर ग्रामीणचा क्रमांक लागतो. एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा पाठशिवणीचा खेळ सुरूच असून काल कमी झालेली आकडेवारीत पुन्हा वाढ झाली आहे.

आज संगमनेर वगळता इतर तालुक्याची आकडेवारी 300 च्या आत आहे तर जामखेड वगळता इतर तालुक्यांची आकडेवारी शंभरच्या पुढे आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी शिस्त पाळत नियमाचे पालन केल्यास जिल्ह्यातील आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास निर्माण होत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 331, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 2003 तर अँटीजेन चाचणीत 1160 असे 3494 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 449, अकोले 388, राहुरी 304, नगर ग्रामीण 285, श्रीरामपूर 264, नगर शहर 241, पारनेर 233, राहाता 231, श्रीगोंदा 211, नेवासा 198, पाथर्डी 158, शेवगाव 157, कोपरगाव 152, कर्जत 104, जामखेड 72, इतर जिल्हा 26, भिंगार कँटोन्मेंट 16, इतर राज्य 03, मिलटरी हॉस्पिटल 02 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply