Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

खुंटेफळ येथील मुलाच्या हत्येचे कोडे उलगडले

शेवगाव पोलिसांना तपास लावण्यात यश

शेवगाव । वीरभूमी - May 14, 2021 • 12:00 AM 11791 views
शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवारी 11 वर्षीय सार्थक आंबादास शेळके या मुलाच्या हत्येचे कोडे उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये म्हणुन ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवार दि. 10 रोजी सायंकाळी 4 ते 4.30 वाजेच्या दरम्यान धारदार शस्त्राने मानेवर वार करून सार्थक शेळके (वय 11 वर्षे) याची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मयत सार्थकचे वडील आंबादास शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकर्‍या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या हत्येमधील मारेकरी अज्ञात असल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर उभा राहिले होते. तपासासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, नगर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके व पोनि. प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. सुजित ठाकरे, सपोनि. विश्वास पावरा, मिथुन घुगे, पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.

या घटनेमध्ये फिर्यादी आंबादास शेळके हे कुटुंबासमवेत घराबाहेर काम करत होते. यामुळे घरात कोणी नाही असे पाहुन आरोपी हा चोरी करण्यासाठी शेळके यांच्या घरात गेला होता. मात्र त्याचवेळी मयत सार्थक शेळके हा तेथे आल्याने आपले बिंग फुटू नये म्हणुन आरोीने हातातील धारदार शस्त्राने सार्थक शेळके याच्या मानेवर वार करून जखमी केले होते.

तपासात वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरु असतांना एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याची माहिती तपासी अधिकारी सपोनि. सुजित ठाकरे यांना समजली. या माहितीची खातरजमा करून आरोपीला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

ताब्यातील अल्पवयीन आरोपीला श्रीरामपूर बालसुधकार गृहात पाठवण्यात आले असून अधिक तपास सपोनि. सुजित ठाकरे हे करत आहेत. आरोपी अज्ञात असतांनाही अवघ्या चार दिवसात पोलिसांनी खुनाचा उलगडा केल्याने नागरिकांमधून शेवगाव पोलिसांचे कौतूक होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply