Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा

अहमदनगर । वीरभूमी- May 15, 2021 • 12:00 AM 1777 views
अखेर एक महिण्याच्या प्रतिक्षेनंतर पी. एम. किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पुर्व तयारीत शेतकरी गुंतला असतांनाच पी. एम. किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्याने बी-बियाणे, खते व मशागतीसाठी या रक्कमेचा उपयोग होणार असल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मागील दोन महिण्यापासून कोरोना संसर्गामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतात पिकवलेला माल विकता येत नसल्याने शेतकर्‍याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी लागणारे पैसे कसे उभे करायचे या विवंचनेत शेतकरी होता.

पी. एम. किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता एप्रिल महिण्यात जमा होईल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र तो हप्ता मे महिण्यात जमा झाला आहे. पी. एम. किसान सन्मान योजनेच्या देशातील तब्बल 9.5 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये 19 हजार कोटी रुपयांचा शेतकरी सन्मान निधी जमा करण्यात आला आहे.

आज सकाळी योजनेच्या अनेक लाभधारक शेतकर्‍यांच्या मोबाईलमध्ये एसएमएस आला आहे. त्या एस. एम. एस. मध्ये म्हटले आहे की, आपल्याला हे कळवताना आनंद होत आहे की, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत एप्रिल 2021 ते जुलै 2021 अवधीसाठी असलेला रू. 2000 चा हप्ता आपल्या खात्यात जमा केला गेला आहे. ह्या महामारीच्या काळात हा आपल्याला विशेष प्रकारे उपयोगी पडेल. मी आपल्याला व आपल्या कुटुंबाला चांगले आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. - पंतप्रधान नरेन्द्र मोदी

असा एसएमएस आला आहे. ऐन कोरोना महामारी व खरीपाच्या तोंडावर पीएम. किसान योजनेचे पैसे जमा झाल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply