Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

रासायनिक खतांच्या दरवाढीवरून स्वाभिमानी आक्रमक

भाजपा खासदार, आमदारांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार

शेवगाव । वीरभूमी- May 15, 2021 • 12:00 AM 1793 views
कोरोना महामारीबरोबरच रासायनिक जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. तर दुसरीकडे रासायनिक खतांची दरवाढ सुरू आहे.

केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा खासदार, आमदारांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे यांनी म्हंटले आहे की, सन 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्यावेळी केल्याने शेतकर्‍यांनी त्यांना भरघोस मतदान केले. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक खताच्या गोणी मागे 700 ते 800 रुपये दरवाढ कोणतीही पूर्वसूचना न देता केली आहे.

या दरवाढीमुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यापेक्षा शेतकरी संपवण्याच्या मार्गावर केंद्र सरकार आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सध्या कोरोना परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. यामुळे शेतीमशागतीचा खर्चही वाढला आहे.

सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे शेतात पिकवलेला मालही विकता येत नाही. त्यामुळे पिकासाठी केलेला खर्चही निघत नाही. त्यातच खरीप हंगामामध्ये खतांचे दर अचानक वाढल्याने केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

रासायनिक खताची होणारी दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने भाजपा खासदार व आमदार यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply