Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात आज आढळले 3144 कोरोना बाधित

पाथर्डी 264, शेवगाव 131, कोपरगाव 235, संगमनेर 163

अहमदनगर । वीरभूमी - May 15, 2021 • 12:00 AM 1994 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आजही तीन हजाराच्या पुढे राहीली आहे. मात्र शुक्रवारच्या तुलनेत काहीशी कमी झाली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 3144 कोरोना बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये दोन दिवस घट तर दोन दिवस वाढ झाल्यानंतर आज पुन्हा घट झाली आहे. मात्र आज आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा तीन हजाराच्या पुढेच असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज 350 ने घट झाली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा नगर ग्रामीणचा असून तो 465 वर पोहोचला आहे. त्या खालोखाल श्रीरामपूर, नगर शहर व पाथर्डीचा क्रमांक लागतो. तर जिल्ह्यातील जामखेड तालुका वगळता इतर तालुक्यांची आकडेवारी शंभरच्या पुढे राहीली आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील आकडेवारी कायम राहत असून कडक लॉकडाऊन नंतरही कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनानेही हात टेकवले आहेत. नागरिकांनी शिस्त पाळत नियमाचे पालन केल्यास जिल्ह्यातील आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास निर्माण होत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 147, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1817 तर अँटीजेन चाचणीत 1180 असे 3144 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर ग्रामीण 465, श्रीरामपूर 391, नगर शहर 316, पाथर्डी 264, कोपरगाव 235, राहाता 213, राहुरी 175, संगमनेर 163, नेवासा 152, अकोले 139, कर्जत 138, पारनेर 135, शेवगाव 131, श्रीगोंदा 112, इतर जिल्हा 57, जामखेड 36, भिंगार कँटोन्मेंट 15, इतर राज्य 02, मिलटरी हॉस्पिटल 05 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply