Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

लोहसर खांडगावात तरूणाची हत्या

दारूसाठी उधारीने घेतलेले पैसे दिले नाही म्हणुन झाली मारहाण

पाथर्डी । वीरभूमी- May 15, 2021 • 12:00 AM 4607 views
पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथे 37 वर्षीय तरूणाने दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणुन झालेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाला आहे.

या मारहाणीच्या घटनेत मयत झालेल्या तरूणाचे नाव सुदाम विक्रम गिते (रा. लोहसर खांडगाव) असे आहे. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील तरुण सुदाम विक्रम गिते (वय 37, रा. लोहसर खांडगाव) याने दारू पिण्यासाठी उधारीने पैसे घेतले होते. मात्र अनेक दिवसानंतरही सुदाम हा आपले उधारीने घेतलेले पैसे देत नसल्याने आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर (दोघे रा. लोहसर खांडगाव) या दोघांनी सुदाम यास लाथाबुक्क्यांनी पोटात, छातीवर, खांद्यावर जोरात मारहाण केली.

या झालेल्या मारहाणीत सुदाम गिते हा मयत झाला. याबाबत मयत सुदाम याचा भाऊ आदिनाथ विक्रम गिते (वय 42, रा. लोहसर खांडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर (दोघे रा. लोहसर खांडगाव) यांच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून दारूच्या नशेपायी तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि. जावळे हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply