Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दरवाढीच्या निषेधार्थ शेवगाव, पाथर्डीत राष्ट्रवादीचे निवेदन

केंद्र सरकारचा केला निषेध । दरवाढ मागे घेण्याची मागणी

शेवगाव, पाथर्डी । वीरभूमी- May 17, 2021 • 12:00 AM 2173 views
केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, रासायनिक खते यांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. या दरवाढीमुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीचा शेवगाव तालुका व पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

देशभरात दिवसेंदिवस केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाबरोबरच रासायनिक खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणुन दैनदिन वापरातील वस्तूंच्याही किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

त्यातच कोरोना संसर्गामुळे हाताला काम नाही यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल, गॅस, रासायनिक खते यांच्या किंमती वाढल्याने आर्थिक नियोजन बिघडले आहे.

या दरवाढीचा निषेध करत माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले व पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना तालुका राष्ट्रवादीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते तथा ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, भागवत गुरूजी, युवक राष्ट्रवादीचे कमलेश लांडगे, ताहेर पटेल, अशोकराव पातकळ, नंदकिशोर मुंढे, समीर शेख, कृष्णा सातपुते, संतोष जाधव, संतोष पावशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाथर्डी येथे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, शहराध्यक्ष योगेश रासणे, दिगंबर गाडे, देवा पवार, शुभम वाघमारे विनय बोरुडे, सतिष शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारने केलेली दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply