Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नगरकरांना आजही दिलासा

आज जिल्ह्यात आढळले 2161 कोरोना बाधित; नेवासा वगळता इतर तालुक्याची आकडेवारी 200 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी - May 18, 2021 • 12:00 AM 2448 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज सोमवारच्या तुलनेत 56 ने वाढ झाली आहे. मात्र मागील आठवड्यापेक्षा आकडेवारीत चांगलीच घट झाल्याने नगरकरांना आजही दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये कमी जास्तचा शिवनापाणीचा खेळ सुरू असतांना दोन दिवसापासून आकडेवारीत घट झाली आहे. रविवारी व सोमवारी आकडेवारीत घट झाल्यानंतर आज मंगळवारी 56 ने वाढ झाली आहे. ही वाढ अल्पशी असल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा हा नेवासा तालुक्यातील असून ती आकडेवारी 296 एवढी आहे. मात्र नेवासा वगळता इतर तालुक्याची आकडेवारी 200 च्या आत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत नेवासा पाठोपाठ पाथर्डी, पारनेर, राहुरीचा क्रमांक लागतो आहे. तर अनेक दिवस उच्चांक करणार्‍या राहाता तालुक्याची आकडेवारी प्रथमच 98 वर आली आहे. जामखेड तालुक्याची आकडेवारीही 85 वर असून इतर तालुके शंभरच्या पुढे आहे.

अशीच आकडेवारी कमी होत राहीली तर संपूर्ण जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता विनाकारण फिरणार्‍यांची जागेवरच अँटीजेन चाचणी करण्याच्या निर्णयामुळे घराबाहेर पडणार्‍यांची संख्या घटून कोरोना बाधितांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 268, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 694 तर अँटीजेन चाचणीत 1199 असे 2161 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी नेवासा 296, पाथर्डी 180, पारनेर 164, राहुरी 161, श्रीरामपूर 143, कर्जत 134, नगर शहर 131, नगर ग्रामीण 131, कोपरगाव 129, श्रीगोंदा 123, संगमनेर 114, शेवगाव 113, अकोले 110, राहाता 98, जामखेड 85, इतर जिल्हा 46, भिंगार कँटोन्मेंट 03 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply