Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पुन्हा चिंता वाढली; आज आढळले 3779 कोरोना बाधित

संगमनेर 617, नेवासा 402, पारनेर 317 इतर सर्व तालुके शंभरच्या पुढे

अहमदनगर । वीरभूमी - May 19, 2021 • 12:00 AM 2886 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतांना अचानक आज तब्बल 1618 कोरोना बाधितांने आकडा वाढून आज 3779 कोरोना बाधितांची भर पडली आहे. तीन दिवसानंतर वाढलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत.

तीन दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालल्याने दिलासा मिळत होता. मात्र आज बुधवारी मंगळवारपेक्षा 1618 बाधितांनी आकडा वाढून तो 3779 वर जावून ठेपला आहे. आज पुन्हा आकडा वाढल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा हा संगमनेरचा असून तो 617 एवढा आहे. तर या खालोखाल नेवासा 402, पारनेर 317, नगर ग्रामीण 264 असा क्रमांक लागतो. तर इतर सर्व तालुके शंभरच्या पुढे आहेत. यामुळे नगरकरांची चिंता पुन्हा वाढू लागली आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 449, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1968 तर अँटीजेन चाचणीत 1362 असे 3779 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी संगमनेर 617, नेवासा 402, पारनेर 317, नगर ग्रामीण 264, राहाता 264, अकोले 250, शेवगाव 234, श्रीगोंदा 209, पाथर्डी 192, नगर शहर 190, कर्जत 171, राहुरी 171, श्रीरामपूर 168, कोपरगाव 141, जामखेड 110, इतर जिल्हा 61, भिंगार कँटोन्मेंट 12, मिलटरी हॉस्पिटल 05, इतर राज्य 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply