Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी नातेवाईकांची ससेहोलपट

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप

कर्जत । डॉ. अफरोजखान पठाण- May 19, 2021 • 12:00 AM 1463 views
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना कर्जत नगरपंचायतीमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म उपलब्ध नसल्याने मृत्यू दाखला देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्या अडचणी दूर करून मृत्यू दाखले दिले जातील, असे आश्वासन दिले.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मागील महिन्यात अनेक कोरोना बाधीतांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. त्या व्यक्तीवर कर्जत नगरपंचायतीच्या वतीने सर्व सोपस्कार पूर्ण करत अंत्यविधी आणि दफनविधीही करण्यात आले. यासह यासर्व मृतांची नोंद कर्जत नगरपंचायत करत असल्याने त्यांचे मृत्यूचे दाखले देण्याची जबाबदारी नगरपंचायतीकडेच देण्यात आली आहे.

त्यासाठी मात्र त्यांना त्यावर उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र मागील अनेक दिवसांपासून कोरोना झालेले वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे मृत्यूचे दाखले प्रलंबित आहेत.

तर दुसरीकडे दररोज मयताचे नातेवाईक मृत्यू दाखला मिळण्यासाठी कर्जत नगरपंचायतीचे उंबरे झिजवत आहेत. मात्र नियमापुढे मुख्याधिकारी देखील हतबल होत असल्याने अनेक नातेवाईकांनी शेवटी आमच्या प्रतिनिधीकडे धाव घेत वरील हकीगत कथन केली. यानंतर मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता यावर लवकरच आपण तोडगा काढून अनेकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत लवकरच मृत्यूचे दाखले मिळतील, असे आश्वासन मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिले आहे.

तर्राबाबत तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृत दाखले कर्जत नगरपंचायत तात्काळ उपलब्ध करेन. याबाबत आपण वैद्यकीय आधिकार्‍यांशी बोललो आहोत. त्यांच्या उपचार कागदपत्र आधारे कोरोना मृत दाखले देण्यात येतील, असे निर्देश संबंधिताना दिले असल्याचे सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply