Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आजची आकडेवारी पुन्हा दोन हजार पार

संगमनेर 270, श्रीरामपूर 226, शेवगाव 203, पारनेर 195, श्रीगोंदा 181

अहमदनगर । वीरभूमी - May 24, 2021 • 12:00 AM 2713 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी हळु हळु कमी होत असतांना आज अचानक रविवारच्या तुलनेत 412 ने वाढली आहे. आज सोमवारी गेल्या चोवीस तासात 2263 कोरोना बाधित आढळले.आता पुन्हा कोरोना बाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होत असतांना आज सोमवारी 421 ने वाढ झाली आहे. मात्र एकाही तालुक्याची आकडेवारी 300 पार नसल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर नगर शहराचा आकडा प्रथमच दोन अंकी म्हणजे 83 वर आला आहे. तसेच राहाता, कोपरगावचा आकडाही दोन अंकी आहे. तर संगमनेर श्रीरामपूर, शेवगाव वगळता इतर तालुके दोनशेच्या आता आहेत.

हळु हळु कमी होऊ लागलेली आकडेवारी आज पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाढणार्‍या आकडेवारीला नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर आकडेवारी कमी होणयास निश्चित मदत होणार आहे. मात्र एक दिवस आकडेवारी कमी झाली तर बेजबाबदारपणामध्ये वाढ होत असल्याने कोरोना आकडेवारीमध्येही वाढ होत आहे.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 776, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 597 तर अँटीजेन चाचणीत 890 असे 2263 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी- संगमनेर 270, श्रीरामपूर 226, शेवगाव 203, पारनेर 195, श्रीगोंदा 181, अकोले 159, जामखेड 135, नगर ग्रामीण 131, कर्जत 130, पाथर्डी 130, नेवासा 126, राहुरी 118, नगर शहर 83, राहाता 82, कोपरगाव 71, इतर जिल्हा 20, भिंगार 02, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहे पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply