Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

मोठा दिलासा ः आजही कोरोना बाधितांचा आकडा घटला

चार तालुके शंभरच्या पुढे; नगर शहरासह इतर ठिकाणचा आकडा दोन अंकावर

अहमदनगर । वीरभूमी - May 28, 2021 • 12:00 AM 2733 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत चालला असून आज तब्बल 202 ने कोरोना बाधितांची आकडेवारी घटली आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात 1408 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत काही दिवसापासून समाधानकारक घट होत आहे. आजही कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये 202 ने घट झाली आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज प्रथमच कोरोना बाधितांचा आकडा 1408 वर आला आहे. आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत पारनेर तालुका प्रथम क्रमांकावर आला आहे. मात्र ती आकडेवारीही दोनशेच्या आत असल्याने दिलासा मिळाला आहे. तर शेवगाव, संगमनेर, अकोले हे चार तालुके वगळता इतर सर्वच ठिकाणची आकडेवारी शंभरच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील एकुण आकडेवारी कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनी असाच संयम पाळला तर लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आज प्रथमच आकडा दीड हजाराच्या आत आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 248, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 910 तर अँटीजेन चाचणीत 550 असे 1408 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी- पारनेर 173, शेवगाव 172, संगमनेर 131, अकोले 119, श्रीरामपूर 94, जामखेड 92, पाथर्डी 92, राहुरी 89, कोपरगाव 86, नगर ग्रामीण 74, नगर शहर 68, कर्जत 47, इतर जिल्हा 46, नेवासा 39, श्रीगोंदा 39, राहाता 32, भिंगार 14, इतर राज्य 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहे पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply