Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आजची कोरोना आकडेवारी पुन्हा वाढली

शेवगाव सर्वोच्च स्थानावर । नगर शहरासह सात तालुके शंभरच्या आत

अहमदनगर । वीरभूमी - May 29, 2021 • 12:00 AM 3513 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत चालला असतांना आज त्यामध्ये थोडीसी वाढ झाली आहे. आज शनिवारी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत 180 ने वाढ झाली असून तो 1588 वर पोहोचला आहे. यामुळे पुन्हा चिंता वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत काही दिवसापासून समाधानकारक घट होत होती. यामुळे दिलासा मिळत असतांना आज शनिवारी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत 180 ने भर पडली आहे. पुन्हा कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत शेवगाव तालुका सर्वोच्च स्थानावर पोहोचला असून ती आकडेवारी 182 एवढी आहे. मात्र ती आकडेवारी दोनशेच्या आत असल्याने दिलासा मिळाला आहे. तर श्रीरामपूर, पारनेर, नगर ग्रामीण, अकोले, संगमनेर, राहुरी व जामखेड शंभरच्या पुढे आहे. तर इतर ठिकाणची आकडेवारी शंभरच्या आत आली आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांचा आकडा आज पुन्हा दीड हजार पार गेला आहे. यामुळे नागरिकांमधून काही अंशी चिंता व्यक्त केली जात आहे. आकडेवारी रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 479, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 530 तर अँटीजेन चाचणीत 579 असे 1588 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी- शेवगाव 182, श्रीरामपूर 170, पारनेर 142, नगर ग्रामीण 134, अकोले 126, संगमनेर 117, राहुरी 110, जामखेड 109, श्रीगोंदा 99, पाथर्डी 79, नगर शहर 69, कोपरगाव 67, राहाता 67, कर्जत 49, नेवासा 43, इतर जिल्हा 14, भिंगार 08, मिलटरी हॉस्पिटल 03 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहे पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply