Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

आतापर्यंत तब्बल 251801 जणांनी केली कोरोनावर मात; उपचार सुरू असलेले रुग्न नऊ हजारांवर

अहमदनगर । वीरभूमी- Jun 02, 2021 • 12:00 AM 1492 views
जिल्ह्यात आज तब्बल 1805 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 51 हजार 801 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात वाढ होऊन ते आता 95.33 टक्के इतके झाली आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला असतांनाच गेल्या चोवीस तासात तब्बल 64 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 858 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आता 9 हजार 08 इतकी झाली आहे. आज बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 188, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 308 आणि अँटीजेन चाचणीत 362 रुग्ण बाधीत आढळले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- पाथर्डी 132, कर्जत 78, नगर ग्रामीण 61, श्रीगोंदा 60, नेवासा 59, संगमनेर 59, श्रीरामपूर 57, नगर शहर 54, राहुरी 49, पारनेर 47, कोपरगाव 39, अकोले 35, राहाता 35, शेवगाव 33, जामखेड 27, इतर जिल्हा 21 भिंगार 08, मिलटरी हॉस्पिटल 04 असे कोरोना बाधित आढळले आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 65, अकोले 54, जामखेड 08, कर्जत 35, कोपरगाव 100, नगर ग्रामीण 126, नेवासा 92, पारनेर 132, पाथर्डी 146, राहाता 82, राहुरी 142, संगमनेर 198, शेवगाव 158, श्रीगोंदा 213, श्रीरामपूर 217, कॅन्टोन्मेंट 04, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 31 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 64 हजार 145 वर पोहोचली असून आतापर्यंत तब्बल 2 लाख 51 हजार 801 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 3336 रुग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. तर सध्या 9 हजार 08 जणांवर उपचार सुरू आहेत.

अशाच प्रमाणे नगरकरांनी संयम पाळत व नियमाचे पालन करत वाटचाल केल्यास लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रत्येकाने नियमाचे पालन करावे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply