Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोरोना बाधितांच्या आकडेवारीत थोडीस वाढ

सहा तालुक्यांनी पुन्हा ओलांडली शंभरी

अहमदनगर । वीरभूमी - Jun 03, 2021 • 12:00 AM 2511 views
अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी बुधवारी कमी झाल्यानंतर आज गुरुवारी पुन्हा एकुण आकडेवारीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आज गुरुवारी बुधवारच्या तुलनेत 468 ने वाढ झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 1326 कोरोना बाधित आढळले. पुन्हा वाढलेल्या आकडेवारी बरोबरच चिंताही वाढली आहे.

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर बुधवारी दरदिवशी आढळणार्‍या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला होता. मात्र आज लगेचच हा आकडा 1326 वर गेला आहे. या आकडेवारीत पुन्हा संगमनेर सर्वोच्च स्थानावर पोहोचला असून तब्बल सहा तालुक्यांची आकडेवारी शंभरी पार गेली आहे. तर इतर तालुके दोन अंकावर स्थिर राहीले आहेत.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 268, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 686 तर अँटीजेन चाचणीत 372 असे 1326 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगमनेर 136, जामखेड 127, नगर ग्रामीण 123, पारनेर 116, श्रीगोंदा 103, अकोले 100, शेवगाव 91, पाथर्डी 87, नेवासा 77, नगर शहर 68, कोपरगाव 64, राहुरी 58, कर्जत 57, श्रीरामपूर 51, राहाता 48, इतर जिल्हा 12, भिंगार 04, मिलटरी हॉस्पिटल 02, इतर राज्य 02 असे कोरोना बाधित आढळले आहे.

एका दिवसानंतर कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्येकाने संयम पाळला तर आकडेवारी कमी होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाने विनाकारण घराबाहे पडणे टाळले पाहिजे. नियमित मास्क वापरला पाहिजे व शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply