Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आज पुन्हा नगरकरांना मोठा दिलासा

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची आकडेवारी 80 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी - Jun 04, 2021 • 12:00 AM 3642 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज मोठी घट झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्येमध्ये घसरण होऊन आज शुक्रवारी ती 771 वर आली आहे. मागील तीन महिण्यातील सर्वात सर्वात निच्चांकी आकडा असल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काल गुरुवारी एकुण रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर आज पुन्हा 555 ने घट झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वोच्च स्थानावर श्रीगोंदा तालुका आहे. मात्र ती आकडेवारी 80 असल्याने दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आज सर्व तालुक्यात आढळलेल्या बाधितांची आकडेवारी दोन अंकी व 80 च्या आत आहे.

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दरदिवशी आढळणार्‍या कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला आहे. नागरिकांनी असाच संयम ठेवला तर नगर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त झालेला दिसेल. मात्र यासाठी सर्वांनी नियम पाळणे महत्वाचे आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 407 तर अँटीजेन चाचणीत 343 असे 771 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- श्रीगोंदा 80, पारनेर 74, पाथर्डी 70, शेवगाव 63, श्रीरामपूर 62, कर्जत 54, राहुरी 54, नेवासा 48, संगमनेर 48, कोपरगाव 46, नगर शहर 44, अकोले 39, राहाता 35, नगर ग्रामीण 26, जामखेड 20, इतर जिल्हा 08 असे कोरोना बाधित आढळले आहे.

प्रत्येकाने संयम पाळत नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करणे यासह शासकीय नियमाचे पालन केल्यास कोरोनावर आपण मात करू शकू, यासाठी सर्वांनी नियम पाळावेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply