Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

तर लॉकडाऊन अटळ ः जिल्हाधिकारी यांनी का दिलाय इशारा?

तर लॉकडाऊन अटळ ः जिल्हाधिकारी यांनी का दिलाय इशारा?

अकोले । वीरभूमी - Jun 08, 2021 • 12:00 AM 4601 views
जिल्हा अनलॅाक झालाय मात्र नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. स्थानिक पदाधिकार्‍यांनी जनता कर्फ्यु करावा, व्यापार्‍यांनी धोका ओळखून 9 ते 2 चे नियम करावे, अन्यथा रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन अटळ आहे, असे इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज राहुरी, राहता, संगमनेर व अकोले तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून ऑक्सिजन प्लॅन्टच्या कामाची पाहणी करुन 100 ऑक्सिजन बेडच्या सुविधेबाबत सुचना केल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, डॉ. सुनिल साळुंके उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात अनलॅाक केल्यानंतर आज नागरिकांचा दृष्टिकोन बदलल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल झालेत मात्र कोरोना अद्याप गेलेला नाही.जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झालेली आहे. ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या ही काठावर आहे.त्यामुळे आता सगळे प्रशासनाने केले पाहिजे ही भावना आता बदलली पाहिजे.

नागरिकांनी स्वतः तथा विद्यमान नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वयंस्फूर्तपणे पुढे येवून जनता कर्फ्यू केला पाहिजे. व्यापार्‍यांनीही तसाही दिवसभर व्यवसायाला ग्राहक नसतात, त्यामुळे त्यांनी 9 ते 2 वाजेपर्यंत दुकाने चालु ठेवून 2 नंतर दुकाने बंद ठेवले तर फिरणार्‍यांची संख्या कमी होईल. ग्रामीण भागातील हिवरे बाजार ग्रामपंचायतने तसे अकोले शहराने करुन अकोले पॅटर्न राज्याचे समोर आणावा. अन्यथा स्वतः निर्बंध घातले नाही तर कोरोना रुग्णसंख्या वाढली व ऑक्सिजन बेडची रुग्ण वाढली तर लॅाकडाऊन अटळ आहे. याला जबाबदार नागरीक व व्यापारीच राहतील.

येणार्‍या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसंदर्भात बोलताना म्हणाले, जिल्ह्यात 22 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होईल, असे नियोजन केले असुन जिल्ह्यात 14 ग्रामीण रुग्णालयामंध्ये लाईट, जनरेटर व सिलेंडर अश्या सर्व सुविधासह ऑक्सिजन प्लॅन्ट व 100 ऑक्सिजन बेड प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात सुरु करत आहोत. 15 जून 2021 पर्यंत ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यन्वित होणार आहे.

तिसर्‍या लाटेतील लहान मुलांवरील प्रार्दुभाव लक्षात घेता रुग्णालयात लहान मुलांसाठी 10 बेडचा स्वतंत्र कक्ष असेल व या मुलांवर उपचारासांठी सद्य स्थितीतील वैद्यकीय अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेच वैद्यकीय अधिकारी मुलांवर उपचार करतील, असे सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply