Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

घटताघटे कोरोना बाधितांचा आकडा

नगरकरांनी पाळलेल्या संयमाला सलाम

अहमदनगर । वीरभूमी - Jun 09, 2021 • 12:00 AM 2404 views
मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिकांनी पाळलेल्या संयमामुळे नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस घटत आहे. आज बुधवारी जिल्ह्याच्या आकडेवारीत घट झाली आहे. आज जिल्ह्यात फक्त 499 कोरोना बाधित आढळल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटू लागल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. या परिस्थितीतही नगरकर शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करत असल्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा घटत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत असून नगरकरांनी नियमाचे पालन करत असाच संयम ठेवल्यास लवकरच नगर जिल्हा कोरोनामुक्त होईल.

आज आढळलेल्या आकडेवारीत संगमनेर तालुका सर्वोच्च स्थानावर असून आज येथे थोडीशी वाढ होत तो आकडा 61 वर पोहोचला आहे. मात्र तरीही दोन अनकी आकड्यामुळे दिलासा मिळत आहे. त्यापाठोपाठ पाथर्डी, अकोले, जामखेडचा क्रमांक लागतो. यापुढेही नगरकरांनी असाच संयम ठेवावा, नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 19, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 171 तर अँटीजेन चाचणीत 309 असे 499 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगमनेर 61, पाथर्डी 57, अकोले 56, जामखेड 46, पारनेर 44, श्रीगोंदा 42, नेवासा 38, राहाता 35, श्रीरामपूर 33, कर्जत 15, राहुरी 15, नगर ग्रामीण 12, शेवगाव 12, कोपरगाव 11, नगर शहर 10, भिंगार 06, इतर जिल्हा 06 असे कोरोना बाधित आढळले आहे.

कोरोनाची आकडेवारी कमी झाली असली तरी कोरोना संसर्ग संपलेला नाही. यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply