Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट

श्रीगोंदा, जामखेड सर्वोच्च । नगर शहराचा आकडा एक अंकी

अहमदनगर । वीरभूमी - Jun 11, 2021 • 12:00 AM 3024 views
मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. जिल्हा अनलॉकनंतर काल गुरुवारी कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ झाली होती. तर आज शुक्रवारी कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली असून आज जिल्ह्यात 769 कोरोना बाधित आढळले आहेत.

मागील आठवड्यापासून नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने घटत आहे. काल गुरुवारी आकडेवारीत वाढ झाल्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा घट झाल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत श्रीगोंदा तालुक्याची आकडेवारी सर्वोच्च स्थानावर पोहोचली असून दुसर्‍या स्थानावर जामखेड आले आहे. तर नगर शहराची आकडेवार एक अंकावर आल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 29, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 281 तर अँटीजेन चाचणीत 459 असे 769 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- श्रीगोंदा 113, जामखेड 103, श्रीरामपूर 88, अकोले 67, संगमनेर 58, नेवासा 53, कोपरगाव 52, पाथर्डी 47, पारनेर 35, शेवगाव 33, कर्जत 29, राहाता 29, नगर ग्रामीण 23, राहुरी 21, नगर शहर 09 असे कोरोना बाधित आढळले आहे.

नगर जिल्हा अनलॉक झाल्यानंतर नागरिकांनी संयम पाळत शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply