Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पाथर्डी शहरात भरदिवसा घरफोडी

नागरिकांमध्ये घबराहाट । बंद घर पाहुन चोरट्यांनी मारला डल्ला

पाथर्डी । वीरभूमी - Jul 06, 2021 • 12:00 AM 1360 views
शहरातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या वामनभाऊ नगर मधील बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी सुट्टी निमित्त गावाकडे गेलेल्या प्राथमिक शिक्षकाच्या घरी चोरी करून सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून नेला. भर दुपारी घडलेल्या या प्रकाराने उपनगरांमध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील येळी गावचे रहिवासी व सध्या पाथर्डी शहरातील वामनभाऊनगर मध्ये राहत असलेले प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर गर्जे आपल्या कुटुंबासह रविवारच्या सुट्टीनिमित्त गावाकडे गेले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डीत येऊन घर उघडून पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. 90 हजार रुपये रोख, व सुमारे 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने पोलिस पुढील तपास करत आहेत. कोरोनामुळे मास्क व उन्हामुळे डोक्याभोवती कापड गुंडाळल्याने चोरट्यांच्या चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विशेष संपर्क अभियान सुरू आहे.

दरम्यान शहरांमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य माणूस पूर्णपणे असुरक्षित असून पोलिसांची दिवसभर शहरात गस्त नसते. रात्री सायरन वाजवत गाडी फिरवली जाते. पोलिसांकडे पुरेशी संख्याबळ नसल्याने दिवसा मात्र केवळ रामभरोसे नागरिक, व्यापारी व रस्त्यावरील पादचारी वावरतात.

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांचे नियमबाह्य वाहनतळ व रस्त्यावरील वाढती वाहतूक यामुळे खिसेकापू, साखळीचोर, वाहनचोरी, मोबाईल चोरांना प्रभावीपणे प्रतिबंध होऊ शकत नाही. प्रमुख चौक, उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणी दिवसा पोलिसांची गस्त सुरू करून शहर पोलीस चौकी व महामार्ग वाहतूक पोलीस दल कार्यान्वित करण्याची नागरिकांची मागणी आहे.

पालिकेची सीसीटीव्ही यंत्रणा बंद
मागील वर्षी आमदार निधीतून सुमारे 30 लाख रुपये खर्चून पालिकेने शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवले. काही दिवसातच निकृष्ट यंत्रणेमुळे ही यंत्रणा बंद पडली. संपूर्ण शहरात तिसरा डोळा कार्यान्वित झाल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळेल अशी लोकांची अपेक्षा फोल ठरली. ’असून अडचण अन नसून खोळंबा’ अशी अवस्था होऊन पालिकेच्या कारभाराविरुद्ध नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply