Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

राज्य मार्ग व गावठाण रस्ता दरम्यान सिमेंट काँक्रीट टाकण्याची बोधेगाव ग्रामस्थांची मागणी

राज्य मार्ग व गावठाण रस्ता दरम्यान सिमेंट काँक्रीट टाकण्याची बोधेगाव ग्रामस्थांची मागणी

बोधेगाव । वीरभूमी - Jul 06, 2021 • 12:00 AM 1265 views
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे राष्ट्रीय रुरबन योजने अंतर्गत 3 कोटी रुपयांची विकास कामे पुर्णत्वाकडे आहेत. गेल्या कित्येक दिवसा पासुन सुरु असलेल्या सिमेंट रोडचे काम शासकीय गोडाउन जवळील शेवगाव ते गेवराई रोड पर्यंत आले आहे. गावातील रोड आणि डांबरी रोडच्या दरम्यान 20 फुटापर्यंतचे अंतर पडले आहे. दरम्यान याठिकाणी सिमेंट काँक्रिटचा रोड न झाल्यास कमी अधिक पावसामुळे माती निघुन खड्डे पडुन अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला मूलभूत सुविधा, आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय रुरबन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याच योजनेत बोधेगाव, हातगाव आणि सोनविहिर या गावाचा समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या माध्यमातून केंद्राचा मोठा निधी ग्रामविकासाकरीता वापरण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी खर्चाच्या कामात बंदिस्त गटारे आणि सिमेंट रोडचे कामे पुर्णत्वाकडे आहे. गावातील ब्राह्मण गल्ली, वाघमारे गल्ली, हनुमाननगर, शिंदे गल्ली, बेकरीच्या ठिकाणापासून ते शासकीय गोडाउन शेजारी रस्त्याचे काम कॉक्रिट टाकून पूर्ण झाले आहे. परंतु यावेळी शेवगाव- गेवराई राज्यमार्ग अवघ्या 20 ते 30 फुटापर्यंत राहिला असताना त्यावर सिमेंट कँक्रीट टाकण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे. शेवगाव- गेवराई मेन रोड आणि गावातुन आलेल्या सिमेंट रस्त्या मधील अंतर फक्त 20 ते 30 फुटापर्यंत राहिले आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने या दोन्ही रस्त्यामधील माती निघुन जाऊन, पाणी साचुन अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी सिमेंट रोड करण्यात यावा. - माणिक गर्जे, जनशक्ती विकास आघाडी, बोधेगाव गोडाउन डिपी शेजारील मेन रोडच्या हद्दीत आपल्याला काम करता येत नाही. रुरबन योजनेतील गोडाउन डिपी शेजारील गावातून आलेला रस्ता आणि मुख्य रोड यातील 20 ते 30 फुटाचे अंतर असून या दरम्यान मुरुम टाकून ते सुस्थितीत करण्यात येणार आहे. - राजाराम काटे, ग्रामविकास अधिकारी, बोधेगाव

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply