Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन तासात पाऊस

मुंबई हवामान विभागाचा अंदाज

अहमदनगर । वीरभूमी- Jul 06, 2021 • 12:00 AM 3234 views
राज्यातील विविध जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा मान्सुन परतत असून आज मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी पुढील तीन तासात गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. या दरम्यान नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मान्सुनचे आगमन झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यात अत्यल्प हजेरी लावली आहे. काही भागात शेतकर्‍यांनी पाऊस येईल या आशेवर पेरण्या केल्या. तर जिल्ह्यातील काही भागात अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत. जेथे पेरण्या झाल्या तेथील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात आहे. मागील रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी कपाशी, बाजरी, तूर, सोयाबिन आदी पेरण्या केल्या होत्या. मात्र रविवारी झालेल्या पावसानंतर आठवडा झाला तरी पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आज मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी मुंबई हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये मुंबई हवामान विभागाने म्हटले आहे की, मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी आगामी तीन तासात अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात 30 ते 40 किलोमीटर/तास यानुसार गडगडाटासह हलकाचा पाऊस पडणार आहे. तरी नागरिकांनी काळजी घेत झाडाखाली उभे राहु नये, शेतातील कामे उरकुन घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळपासुन ढगाळ वातावरण असून शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसला आहे. आज व आगामी काही दिवसात चांगला पाऊस झाला तर दुबार पेरणीचे संकट टळून राहीलेल्या पेरण्या होतील. अन्यथा हा हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply