Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज पुन्हा वाढला

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज पुन्हा वाढला

अहमदनगर । वीरभूमी- Jul 06, 2021 • 12:00 AM 2476 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा शिवनापाणीचा खेळ खेळत आहे. आज मंगळवारी नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारच्या तुलनेत वाढला आहे. आज जिल्ह्यात एकुण 475 कोरोना बाधित आढळले.

आज मंगळवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये श्रीगोंदा तालुका सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र ही आकडेवारी 66 एवढी असल्याने दिलासा मिळत आहे. त्या खालोखाल संगमनेर, पारनेरचा क्रमांक लागतो. मात्र सर्वच तालुके 66 च्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज आझळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा लॅबमध्ये 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 194 तर रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये 260 असे एकुण 475 कोरोना बाधित आढळले आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीगोंदा 66, संगमनेर 50, पारनेर 48, पाथर्डी 41, राहुरी 39, कर्जत 31, राहाता 30, नगर ग्रामीण 26, नगर शहर 24, नेवासा 24, जामखेड 23, शेवगाव 21, कोपरगाव 19, अकोले 13, श्रीरामपूर 12, इतर जिल्हा 08 असे एकुण 475 कोरोना बाधित आढळले.

नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply