Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आरोपी कान्हु मोरेसह चौघांविरोधात 942 पानांचे दोषारोपपत्र दाखल

पत्रकार रोहिदास दातीर यांच्या अपहरण व हत्या प्रकरण

अहमदनगर । वीरभूमी- Jul 06, 2021 • 12:00 AM 1591 views
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. गुन्ह्यातील आरोपी अज्ञात असतांनाही पोलिसांनी खुनाचा तपास लावून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपी कान्हु मोरे याच्यासह चार साथीदारांविरोधात 942 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

गणेगाव येथील जमिनीच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला 286/2021 भादंवि कलम 363, 341 वाढीव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25 वर्ष, रा. जुने बसस्टँड जवळ, एकलव्य वसाहत, राहुरी) व तोफिक मुक्तार शेख (वय 21 वर्ष, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह अन्य एक जण फरार होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असलेबाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने त्यास सापळा रचून शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात जोरदार युक्तिवाद करून 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळवून सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला.

यातील दुसरा फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया (ता. बीनंदनकी, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) येथून शिताफीने अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना व्यापारी अनिल गावडे याने आरोपी कान्हु मोरे यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत, अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु सर्व राजकीय दबाव झुगारून व्यापारी गावडे यास आरोपी केले व भादंवि कलम 212 प्रमाणे वाढवून न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे याचेसह लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी, तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे व अनिल जनार्धन गावडे यांच्याविरोधात 942 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

पत्रकार रोहिदास दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते होते. यामुळे त्यांची हत्या झाल्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजले होते. आरोपीच्या अटकेकरीता विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटना यांनी निवेदने दिली होती.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply