Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कोरोना लसीकरण सुरु असतांनाच डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना

पाथर्डी । वीरभूमी - Jul 06, 2021 • 12:00 AM 6119 views
पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतांनाच तेथील डॉ. गणेश शेळके (वय 45, रा. बहिरवाडी, ता. नेवासा) यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार दि. 6 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील तिसगार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या करंजी उपकेंद्रावर आज मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी सकाळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होते. दरम्यान उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणुन रुजु असलेले डॉ. गणेश शेळेके (रा. बहिरवाडी, ता. नेवासा) हे तणावाखाली असल्याचे दिसत होते.

लसीकरण सुरू असतांना त्यांनी तेथील एका कर्मचार्‍याला कागद व पेन मागितला व त्यांनी उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा आतून दरवाजा बंद करून घेतला. बराचवेळ झाल्यानंतरही डॉ. शेळके हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांना आवाज दिला. मात्र तरीही काहीही प्रतिसाद न आल्याने तेथील कर्मचार्‍यांनी दरवाजा तोडून पाहिले तर डा. गणेश शेळके यांनी दालनातील छताच्या फॅनला गळफास घेतल्याचे दिसले.

यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळवल्यानंतर सपोनि. कौशल्य वाघ, अरविंद चव्हाण, सतिष खोमणे, भाऊसाहेब तांबे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

डॉ. शेळके यांनी कोणत्या कारणाने गळफास घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पाथर्डी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply