Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

जिल्ह्याची आजची आकडेवारीही चिंता वाढवणारी

संगमनेर शंभरी पार । पारनेर, राहुरी व नगर ग्रामीण वगळता सर्व तालुक्यांच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Jul 18, 2021 • 12:00 AM 2567 views
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत नाही तोच पुन्हा जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज वाढ झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात तब्बल 758 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नगरकरांची आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे.

मागील काही दिवसापासून कमी होत असलेली कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होवू लागली आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीने 758 चा आकडा गाठल्याने जिल्ह्यातील उपचार घेणार्‍या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे काल शनिवरी पारनेर तालुका टॉपवर होता. मात्र आज रविवारी आढळलेल्या आकडेवारीत पारनेरसह नगर ग्रामीण, राहुरी तालुक्यांतील आकडेवारीत शनिवारच्या तुलनेत घट झाली आहे. मात्र इतर तालुक्यांची आकडेवारीमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शनिवारच्या तुलनेत रविवारी तब्बल 168 कोरोना बाधितांने वाढ झाली आहे. यामध्ये खाजगी प्रयोगशाळा व अँटीजेन चाचणी अहवालात वाढ झाली आहे. नागरिकांनी गर्दी टाळत नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 18, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 338 तर अँटीजेन चाचणीत 402 असे 758 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 119, पाथर्डी 86, पारनेर 78, कर्जत 77, शेवगाव 54, नगर शहर 46, अकोले 46, नेवासा 43, श्रीगोंदा 36, कोपरगाव 35, श्रीरामपूर 34, राहाता 25, नगर ग्रामीण 25, जामखेड 25, राहुरी 18, इतर जिल्हा 10, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply