Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

राष्ट्रवादीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी या तरुण नेत्याची निवड

आ. राजळे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची रणनिती

पाथर्डी । वीरभूमी- Jul 18, 2021 • 12:00 AM 2859 views
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्याच्या राजकारणात आ. मोनिका राजळे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांचे चुलत दीर माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे यांची तालुकाध्यक्ष म्हणुन निवड केल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही निवड महत्वाची मानली जात आहे.

पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला तरुण नेतृत्वाची गरज विचारात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तालुकाध्यक्षपदी माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे यांची निवड केली आहे. गेल्या पाच वर्षापासून राजळे विरुद्ध राजळे हा संघर्ष जिल्हा परिषदेच्या कासार पिंपळगाव गटात पहायला मिळत होता. मात्र आता शिवशंकर राजळे यांच्या निवडीने हा संघर्ष संपुर्ण तालुक्यात पाहायला मिळणार आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाथर्डी नगरपरिषद, विधानसभा निवडणुकांडोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाने खांदेपालट केली आहे. आज रविवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेवरून माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांची राष्ट्रवादीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.

शिवशंकर राजळे हे आ. मोनिका राजळे यांचे चुलत दीर असून मागील जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिवशंकर राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजळे विरुद्ध राजळे राजकारणाला गती दिली होती. त्यातच आता शिवशंकर राजळे यांची राष्ट्रवादीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी निवड केल्याने संपुर्ण तालुक्यात राजळे विरुद्ध राजळे असा संघर्ष पहायला मिळणार आहे.

निवडीनंतर शिवशंकर राजळे यांनी वीरभूमीला प्रतिक्रिया देतांना सांगितले की, तालुक्यातील गावागावांत राष्ट्रवादी पक्षाच्या शाखा उघडून पक्ष संघटन मजबुत करू. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका व विधानसभा निवडडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळवण्यासाठी पक्ष संघटन करून राष्ट्रवादीला तालुक्यात एक नंबरचा पक्ष बनवू. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेत मा. शरद पवार यांची विचारसरणी घराघरात पोहोच करण्याचे काम केले जाईल, असे सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply