Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

नगर जिल्ह्याला काही अंशी दिलासा

पारनेर पुन्हा टॉपवर । जामखेड, पारनेर वगळता इतर तालुक्यांच्या आकडेवारीत घट

अहमदनगर । वीरभूमी- Jul 19, 2021 • 12:00 AM 1836 views
आज सोमवारी नगर जिल्ह्याला काही अंशी दिलासा मिळाला असून रविवारच्या तुलनेत आज आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट झाली आहे. आज सोमवारी जिल्ह्यात एकुण 460 कोरोना बाधित आढळले.

काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कधी घट तर कधी वाढ होत आहे. रविवारी तब्बल 758 कोरोना बाधित आढळल्यानंतर आज सोमवारी 460 कोरोना बाधित आढळले. आकडेवारीत घट झाल्याने नगरकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

आज सोमवारी आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत पुन्हा पारनेर तालुका टॉपवर आला असून रविवारच्या तुलनेत पारनेर व जामखेड तालुक्यातील आकडेवारीमध्ये वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या आकडेवारीत घट झाली आहे.

यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळत असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 02, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 214 तर अँटीजेन चाचणीत 244 असे 460 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 81, जामखेड 56, कर्जत 49, शेवगाव 43, नेवासा 39, पाथर्डी 39, श्रीगोंदा 31, संगमनेर 28, कोपरगाव 25, श्रीरामपूर 20, राहुरी 16, नगर शहर 11, राहाता 08, अकोले 06, नगर ग्रामीण 06, भिंगार 01, इतर जिल्हा 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply