Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

आज पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा वाढला

संगमनेर शंभरी पार । जामखेड दुसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी - Jul 20, 2021 • 12:00 AM 2225 views
सोमवारी नगर जिल्ह्याला काही अंशी दिलासा मिळाल्यानंतर मंगळवारी पुन्हा वाढ झाली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात 567 कोरोना बाधित आढळले असून नगरकरांची चिंता वाढली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी कासवगतीने वाढत आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेरने शंभरीचा आकडा पार केला आहे. आज संगमनेर तालुक्यात तब्बल 108 कोरोना बाधित आढळले असून त्या खालोखाल जामखेड 88, पारनेर 77, कर्जत 47, पाथर्डी 47 असे रुग्ण आढळले आहेत.

काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कधी घट तर कधी वाढ होत आहे. सोमवारी 460 कोरोना बाधित आढळल्यानंतर आज मंगळवारी 567 कोरोना बाधित आढळले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत पुन्हा संगमनेर तालुका टॉपवर आला असून जामखेड दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. तर पाथर्डी, नगर ग्रामीण, अकोले, राहाता वगळता इतर तालुक्याच्या आकडेवारीत घट झाली आहे.

यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळत असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 63, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 205 तर अँटीजेन चाचणीत 298 असे 567 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 108, जामखेड 88, पारनेर 77, कर्जत 47, पाथर्डी 47, शेवगाव 30, नगर ग्रामीण 25, श्रीगोंदा 25, नेवासा 24, कोपरगाव 20, श्रीरामपूर 18, राहाता 16, राहुरी 16, अकोले 13, नगर शहर 07, इतर जिल्हा 06 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply