Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

महिला अधिकार्‍याचा विनयभंग; शेवगावच्या तरुणावर गुन्हा

महिला अधिकार्‍याचा विनयभंग; शेवगावच्या तरुणावर गुन्हा

शेवगाव । वीरभूमी- Jul 21, 2021 • 12:00 AM 5528 views
शेवगाव तालुक्यातील एका वरीष्ठ महिला अधिकार्‍याचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यातील शासकीय कर्मचार्‍यांसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या महिला अधिकार्‍याने आरोपी विरोधात पोलिसांत तक्रात दिली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिला अधिकार्‍याने म्हटले आहे की, गेल्या काही महिण्यापासून अश्लिल शेरेबाजी करणे, बदनामी करणे, अश्लिल मेसेज पाठविणे तसेच कार्यालयीन कक्षात एकटी असतांना येण्याचा प्रयत्न करणे. त्याला विरोध केला असता खोट्या तक्रारी करून आंदोलने करत असल्याचे म्हटले आहे.

तसेच विशाल बलदवा हा फोन करून तसेच कार्यालयात चकरा मारून ओळख वाढविण्याचा प्रयत्न करत असे. अवैध धंदे सुरु करण्यासाठी मी आपल्याला मदत करतो. या माध्यमातून येणारे पैसे मी तुम्हाला पोहोच करत जाईल, असे म्हणुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे.

त्याचप्रमाणे माझ्यावर पाळत ठेवून तुम्ही ड्रेस घालतात त्यामुळे छान व फ्रेश दिसतात, अशी शेरेबाजी करत होता. याबाबत संबधित अधिकार्‍याने कार्यालयीन कामासंबधीच बोलावे, असे सांगितले होते. मात्र त्याने पाठलाग चालु ठेवत कामांमध्ये ढवळाढवळ करू लागला. एवढेच नव्हे तर आपल्या विरोधात तक्रारी करून व फोन करून त्रास देत होता. बलदवा याने उपोषणासाठी फलक छापून त्यावर विचित्र फोटो छापून अधिकार्‍यांची बदनामी केली. तसेच पती व मुली बद्दलही बाईट बोलून त्यांनाही चुकीची व बदनामीकारक माहिती देत, मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या महिला अधिकार्‍याने शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सपोनि. सुजित ठाकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात तथ्य आढळून आल्यानंतर आज मंगळवारी विशाल बलदवा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply