Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

काळजी घ्या ः कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये पुन्हा वाढ

पारनेर आजही टॉपवर । पहा आपल्या तालुक्यातील आजची आकडेवारी

अहमदनगर । वीरभूमी- Jul 22, 2021 • 12:00 AM 2132 views
आज गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 789 कोरोना बाधित आढळले.

अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी कासवगतीने वाढत आहे. तसेच पारनेर तालुकाही टॉपवर राहत आहे. आज आढळलेल्या बाधितांच्या आकड्यामध्ये पारनेरने पुन्हा शंभरी पार केली असून आज 158 कोरोना बाधित आढळले आहेत.

तर दुसर्‍या स्थानावर पाथर्डी तालुका असून येथे 88 कोरोना बाधित आढळले आहेत. त्या खालोखाल श्रीगोंदा 87, कर्जत 81 चा क्रमांक लागतो. आज आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालाचा आकडा 246 वर गेल्याने जिल्ह्याचा आकडा वाढला आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडतांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे. नियमित मास्क वापवारा, हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 246, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 200 तर अँटीजेन चाचणीत 343 असे 789 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 158, पाथर्डी 88, श्रीगोंदा 87, कर्जत 81, संगमनेर 66, जामखेड 55, शेवगाव 48, अकोले 36, नगर ग्रामीण 32, नगर शहर 31, नेवासा 29, कोपरगाव 22, राहाता 18, श्रीरामपूर 14, राहुरी 12, इतर जिल्हा 08, भिंगार 03, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply