Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव तालुक्यातील या भागात पुन्हा बिबट्याची दहशत

शेळीच्या पिल्लाचा पाडला फडश्या

शेवगाव । वीरभूमी- Jul 23, 2021 • 12:00 AM 3916 views
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने शेळीच्या पिल्लाला झडप घालून ठार केले. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने भातकुडगाव भागात पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण होवू लागली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचा संचार असल्याचे शेतकर्‍यांच्या निदर्शनास येत होते. अनेकवेळा बिबट्याने शेतकर्‍यांना दर्शनही दिले. मात्र कोणतीही हानी न झाल्याने सर्वत्र शांतता होती. मात्र या बिबट्याने भातकुडगाव येथील श्री. फटांगरे यांच्या शेळीच्या पिल्लाचा फडश्या पाडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यांत शेळीचे पिल्लू ठार झाल्याची घटना वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तेथील ठश्यावरून हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून परिसरात पिंजरा लवला आहे.

सध्या शेतीची कामे सुरू असून शेतकर्‍यांनी शेतात काम करतांना विशेष खबरदारी घ्यावी. एकट्याने फिरु नये, हातात काठी ठेवावी. गळ्याला मफलर अथवा स्कार्फ गुंडाळून काम करावे. आणखी मदत लागत असल्यास शेतकर्‍यांनी वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply