Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोरोना बाधितांचा आकडा काही केल्या कमी होईना

संगमनेर पुन्हा शंभरीपार । श्रीगोंदा दुसर्‍या तर पाथर्डी तिसर्‍या स्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Jul 24, 2021 • 12:00 AM 2219 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारी आज शुक्रवारच्या तुलनेत घट झाली असली तर बाधितांचा आकडा मोठा असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 729 कोरोना बाधित आढळून आले. शुक्रवारच्या तुलनेत आज 55 ने घट झाली आहे.

नगर जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 784 कोरोना बाधित आढळले होते. मात्र आज यामध्ये 55 ने घट होत हा आकडा 729 वर आला आहे. मात्र संगमनेर तालुका पुन्हा टॉपवर आला असून आजची आकडेवारी शंभरी पार आहे. आज संगमनेरात 103 कोरोना बाधित आढळले. दुसर्‍या स्थानावर श्रीग़ोंदा 96, तिसर्‍या स्थानावर पाथर्डी 79 असा क्रम लागतो.

मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत थोडी थोडी वाढ होत आहे. काल शुक्रवार पर्यंत एकुण रुग्णसंख्या 2 लाख 92 हजार 03 वर पोहोचली तर 2 लाख 81 हजार 813 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 4 हजार 89 वर पोहोचली असून कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 6 हजार 101 वर पोहोचला आहे.

कासवगतीने वाढत असणार्‍या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 184, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 239 तर अँटीजेन चाचणीत 306 असे 729 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 103, श्रीगोंदा 96, पाथर्डी 79, पारनेर 61, कर्जत 55, अकोले 53, नगर शहर 53, नगर ग्रामीण 43, शेवगाव 41, राहुरी 38, राहाता 30, कोपरगाव 24, जामखेड 19, श्रीरामपूर 14, नेवासा 10, इतर जिल्हा 09, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply