Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

कोरोना रुग्ण वाढीत जिल्ह्याला काही अंशी दिलासा

पारनेर पुन्हा टॉपवरच । सर्व तालुके शंभरच्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Jul 26, 2021 • 12:00 AM 2184 views
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी कोरोना बाधित रुग्णांनी उच्चांक केल्यानंतर आज सोमवारी आकडेवारीत घट झाली आहे. रविवारच्या तुलनेत तब्बल 398 ने घट होत आज सोमवारी जिल्ह्याचा एकुण आकडा 628 वर आला आहे. यामुळे नगरकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

रविवारी जिल्ह्यात कोरोनाचा महास्फोट झाल्यानंतर आज दुसर्‍या दिवशी बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर सर्वच तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत असून संगमनेरचा आकडा एकअंकी आला आहे. तर पारनेर तालुका आजही टॉपवर राहीला आहे. तर नगर ग्रामीण दुसर्‍या तर कर्जत तालुका तिसर्‍या स्थानावर आले आहेत.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यात मोठी वाढ होत असतांना आज काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र हा आकडा 628 वर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र सर्वच तालुकी शंभरच्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

कासवगतीने वाढत असणार्‍या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 184, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 182 तर अँटीजेन चाचणीत 262 असे 628 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 93, नगर ग्रामीण 84, कर्जत 65, पाथर्डी 62, संगमनेर 52, नगर शहर 49, शेवगाव 47, राहुरी 28, जामखेड 27, श्रीगोंदा 25, कोपरगाव 24, अकोले 21, नेवासा 20, राहाता 16, इतर जिल्हा 12, श्रीरामपूर 05, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply