Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांचा आकडा वाढताच

पारनेर टॉपवरच । कर्जत, संगमनेर दुसर्‍या तर शेवगाव तिसर्‍या स्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Jul 27, 2021 • 12:00 AM 2289 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज पुन्हा वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात 712 कोरोना बाधित आढळले.

रविवारी जिल्ह्यात कोरोनाचा महास्फोट झाल्यानंतर सोमवारी काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र आज मंगळवारी पुन्हा सोमवारच्या तुलनेत आकडेवारीत वाढ झाली आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नेहमीप्रमाणे पारनेर तालुका टॉपवर राहीला आहे. मात्र ती आकडेवारी सोमवारच्या तुलनेत घटली आहे. तर कर्जत व संगमनेर तालुकेदुसर्‍या स्थानावर आले आहेत. तर शेवगाव तिसर्‍या क्रमांकावर आला आहे.

कासवगतीने वाढत असणार्‍या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 44, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 294 तर अँटीजेन चाचणीत 374 असे 712 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 90, कर्जत 87, संगमनेर 87, शेवगाव 71, नेवासा 59, जामखेड 56, नगर ग्रामीण 40, अकोले 39, पाथर्डी 37, श्रीगोंदा 28, राहुरी 25, राहाता 24, कोपरगाव 21, नगर शहर 18, इतर जिल्हा 14, श्रीरामपूर 12, भिंगार 02, मिलटरी हॉस्पिटल 02 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply