Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

अर्बन बँक शेवगाव शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

आत्महत्येपुर्वी आढळली चिठ्ठी । शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ

शेवगाव । वीरभूमी- Jul 27, 2021 • 12:00 AM 7226 views
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. 27 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मयत गोरक्षनाथ शिंदे यांच्या खिश्यामध्ये आत्महत्येपुर्वी लिहलेली एक चिठ्ठी आढळली आहे. मात्र या चिठ्ठीत काय लिहिले याबाबत समजू शकले नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) हे दि. 31 मे 2021 रोजी सेवा निवृत्त झाले होते. मात्र बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिण्यासाठी वाढवून दिला होता.

आज मंगळवार दि. 27 रोजी सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे हे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान शेतामध्ये त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

या दुदैवी घटनेची माहिती शेवगाव तालुक्यास जिल्ह्यात समजताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.

आत्महत्येपुर्वी गोरक्षनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकले नाही. यामुळे चिठ्ठीत कोणाचे नाव आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत पोलिसांकडून मौन पाळले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply