पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट
प्लॉट विक्रीचे पैसे घेऊन जाताना दुचाकीस्वारांचा हल्ला; दीपक येळाई जखमी, चोरट्यांचा शोध सुरू
प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात असलेल्या दीपक येळाई यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला करून त्यांच्याकडील नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी दिवसाढवळ्या पाथर्डी शहरातील पेठ परिसरात नवरंग कापड दुकानासमोर घडली. या झटापटीत देपक येळाई हे जखमी झाले आहेत.
दीपक येळाई हे प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात होते. ते बाजारपेठेतील नवरंग कापड दुकानासमोरुन जात असतांना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत दीपक येळाई यांना दुखापत झाली. चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील नऊ लाख रुपयांची रोकड हिसकावून घेत दुचाकीवरून घटनास्थळावरून पोबारा केला.
दरम्यान, पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी गुरुवारीच पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच शहरात दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट झाल्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर जखमी दीपक येळाई यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी रुग्णालयात भेट देऊन येळाई यांची विचारपूस केली.