‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर
कामगारांसह नागरिकांची आरोग्य तपासणी; प्रतिबंधात्मक उपाययोजना, संतुलित आहार व निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती
डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) निर्देशानुसार ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत साईनाथ उद्योग इंडस्ट्रीज, अहिल्यानगर येथे कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कामगारांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच श्रमिकनगर येथील मल्लेशम येमुल आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अभियानाच्या माध्यमातून आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. योग्य व संतुलित आहार, नियमित व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैली, विविध आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात सहभागी नागरिकांच्या आरोग्यस्थितीनुसार आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. ‘निरोगी समाज, सुदृढ कुटुंब’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून समाजातील विविध घटकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
वैद्यकीय सेवा संचालक ब्रिगेडियर डॉ. अरुण त्यागी (सेवानिवृत्त), प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रसाद काजळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय व सामाजिक सेवा पथकाने उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय समाजकार्यकर्ता संतोष साळवे, निलेश बनसोडे आणि करण ढोकणे यांनी शिबिराच्या नियोजन, समन्वय व आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्या व विभागप्रमुख डॉ. योगिता औताडे यांच्या समन्वयातून अमोल अनाप, राहुल कडू, विशाल पुलाटे, दिनेश मगर, प्रिती कडू यांच्यासह विद्यार्थ्यांनी अभियानाच्या नियोजन व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.