Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी

दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील

कुकडीच्या आवर्तनातून जामखेडला पाणी देण्याबाबत सकारात्मक विचार l अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा टाळण्याच्या सूचना

जामखेड । वीरभूमी - Oct 01, 2026 • 05:38 PM 2 views
टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाताना प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत संवेदनशीलपणे काम करावे. कोणताही नियम अथवा कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, जामखेड तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णयांची कार्यवाही सुरू केली आहे. कुकडी धरण समूहातील पाण्याचा लाभ आवर्तनाच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आरणगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीपिकांची पाहणी करून त्यांना दिलासा दिला.

कर्जत-जामखेड तालुक्यातील दुष्काळी भागातील प्रश्न समजून घेण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. सुनील कर्जतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्षा सौ. प्रांजली चिंतामणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, वीज वितरण कंपनीचे रमेश पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, प्रांताधिकारी नितीन पाटील, विनायक देशमुख, अंबादास पिसाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगतीने निर्णय घेतले आहेत. उपलब्ध पाणी राखून ठेवतानाच जनावरांसाठी चारा व पाण्याचे नियोजन करणे प्राधान्याचे आहे. तालुक्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करावे, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे स्पष्ट करून टँकर नियोजनासाठी ग्रामसेवक व तलाठ्यांची उपस्थिती सक्तीची करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागातील अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे. बैठकीत चुकीची अथवा खोटी माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जनतेमध्ये रोष निर्माण होऊ देऊ नका; अन्यथा कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा इशाराही मंत्री विखे पाटील यांनी दिला.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कवडगाव, चौंडी, जवळा परिसरातील कोल्हापूर बंधाऱ्यांची कामे, मोहरी तलावाचा सांडवा तसेच कुकडी कालव्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने निधीची उपलब्धता करून दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. कोणाला खूष करण्यासाठी चुकीची माहिती देऊ नये. पीकविमा, वीजप्रश्न आणि जलजीवन मिशनच्या योजनांबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज आहे, असे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. यावेळी आ. सुनील कर्जतकर यांनीही विविध सूचना केल्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply