Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा

माजी आमदार चंद्रशेखर घुले । शेवगाव बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा

शेवगाव । वीरभूमी - Sep 30, 2026 • 11:14 PM 125 views
बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारदर्शक व्यवहार, योग्य बाजारभाव, मूलभूत सुविधा तसेच शेतमाल विक्रीसाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.

शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी घुले बोलत होते. सभेस शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे सभापती हनुमान पातकळ, बबनराव भुसारी, पंडित भोसले, वसंतराव लांडे गुरुजी, उपसभापती अशोक धस, कैलास नेमाने, सुधाकर लांडे, ताहेर पटेल, एजाज काझी आदी उपस्थित होते.

घुले म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि दर मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. बदलत्या कृषी क्षेत्राचा विचार करून भविष्यातील गरजांनुसार बाजार समितीच्या कामकाजात आवश्यक सुधारणा कराव्यात.

यंदा पावसाअभावी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासह शेतीशी संबंधित अडचणींमधून दिलासा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे घुले यांनी सांगितले.

सभेदरम्यान बाजार समितीच्या वार्षिक कामकाजासह शेतकरी व व्यापाऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बाजार समितीच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत उपस्थितांनी सूचना मांडल्या. सभासदांच्या सूचना व अडचणींचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका संचालक मंडळाने घेतली.

यावेळी बाळासाहेब वडघणे, बाळासाहेब ढाकणे, अनिल मडके, प्रदीप काळे, नाना मडके, विजय देशमुख, अरुण घाडगे, जगदीश धूत, निलेश रोकडे, भारत मोटकर, सचिन फटांगरे, मिलिंद गायकवाड, दत्तात्रय फुंदे, संजय नांगरे, कैलास देहडराय यांच्यासह बाजार समितीचे संचालक मंडळ, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक, व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती हनुमान पातकळ यांनी केले. सूत्रसंचालन संजय कोळगे यांनी केले, तर सचिव मुद्दसर शेख यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply