Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहीगाव नेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक एस.एस. आणि विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) श्री. माणिक लाखे यांचा शेतकरी बांधवांसाठी विशेष लेख

अहिल्यानगर । वीरभूमी - Aug 27, 2026 • 11:40 AM 48 views
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहीगाव नेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक एस.एस. आणि विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) श्री. माणिक लाखे यांचा शेतकरी बांधवांसाठी विशेष लेख......

पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा कोरड्या आणि उष्ण हवामानात पिकाची वाढ खुंटते, पाने सुकतात,तेसेच पिकांवर वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हुमणी सारख्या घातक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.ऊस पिकावर पांढरी माशी ,पायरीला यासारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आढळून येत आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता ऊस, सोयाबीन, तूर, कापूस आणि डाळिंब या प्रमुख पिकांचे पाण्याचे , खतांचे नियोजन आणि कीड नियंत्रण कसे करावे, याविषयी कृषी तज्ज्ञांनी खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

ऊस : पाण्याचे नियोजन काटेकोर करावे त्यासाठी ओलावा मोजणी यंत्राचा वापर करावा.
पाचट जागेवरच कुजवा: उसाच्या खालची वाळलेली पाने (पाचट) न जाळता ती दोन ओळींमधील सरीमध्ये व्यवस्थित पसरावीत. पाचट आच्छादनामुळे (Mulching) जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते आणि ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.
मल्चिंग (आच्छादन) करणे: शेतातील काढलेले तण किंवा पिकांचे अवशेष ओळींच्या मध्ये पसरावेत (मल्चिंग करावे). यामुळे जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो.

एक आड एक सरीने पाणी देणे: पाण्याची टंचाई असल्यास, उपलब्ध पाण्यातून सर्व शेत भिजवण्यासाठी एका आड एक सरी पद्धतीने (Alternate Furrow Irrigation) पाणी द्यावे. यामुळे पाण्याची ५०% बचत होते.
ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर: पाणी देण्यासाठी फक्त आणि फक्त ठिबक सिंचनाचा वापर करावा. उसाला पाणी नेहमी रात्रीच्या वेळी किंवा पहाटे द्यावे, जेणेकरून उन्हामुळे पाणी उडून जाणार नाही.
पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश 2% + युरिया 2% यांच्या मिश्रणाची दर ३ आठवड्यानी फवारणी करावी , पिकाच्या पानातून होणारे पाण्याचे बाष्पउत्सर्जन कमी करण्यासाठी ६ ते ८ % काओलीनची (६०० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी), १-१.५ % पोटॅशियम नायट्रेट (१००ते १५० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी) , १-२ % सिलिकॉन न्यूट्रियंट (२० मिली प्रती १० लिटर पाणी) यासारख्या बाष्पत्सर्जन रोधकांची पानावरील फवारणी करावी. यामुळे पानांवर थर तयार होऊन बाष्पीभवन कमी होते.

रासायनिक खतांचा वापर तूर्तास थांबवावा, युरिया देणे पूर्णपणे बंद करावे, पावसाचा खंड असेपर्यंत जमिनीतून रासायनिक नत्रयुक्त खते (उदा. युरिया) देणे पूर्णपणे टाळावे. कोरड्या जमिनीत युरिया दिल्यामुळे पिके अधिक वेगाने करपतात किंवा सुकतात. आडसाली उसाची लागवड पाण्याची उपलब्धता पाहून करावी.
डीएपी (DAP): पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी २% डीएपी (२०० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी) ची फवारणी करावी कोरड्या हवामानात उसावर प्रामुख्याने हुमणी, पांढरी माशी आणि पायरीला या सारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो:

हुमणी अळी (White Grub): पाऊस नसल्यामुळे हुमणी अळी जमिनीच्या वरच्या थरात येऊन उसाची मुळे कुरतडते. यामुळे ऊस वाळू लागतो. जैविक नियंत्रणासाठी 'मेटारायझियम अ‍ॅनिपिली + बिव्हेरिया बॅसियाना' ही बुरशी प्रति एकरी २ ते ३ किलो शेणखतात मिसळून उसाच्या मुळापाशी द्यावी किंवा ड्रेंचिंग (आळवणी) करावी. किवा इपिएन ५ किलो प्रती एकर प्रमाणे२०० लिटर पाण्यातून ठिबक सिंचन, पाठ पाण्याद्वारे किवा शेणखतात मिसळून द्यावे किवा फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रीड ४०% ५०० ग्रॅम १२५० लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी सोडावे.

खोड किडा (Early Shoot Borer): कडक उन्हामुळे खोड किड्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि उसाचे पोंगे वाळतात. शेतात हेक्टरी २५ कामगंध सापळे (Pheromone Traps) लावावेत. प्रादुर्भाव जास्त असल्यास 'क्लो्रअँट्रानिलीप्रोल' (कोराजन) ४ मिली प्रती १० लिटर पाणी फवारणी करावी. उसावरील पांढरी माशी आणि पायरीला चा बंदोबस्त करावा त्यासाठी क्विनॉलफॉस २५% एक १२०० मिली प्रती हेक्टर प्रमाणे फवारणी करावी किवा थायोमीथॉक्झाम२५ डब्ल्यूजी १२५ ग्रॅम ७५० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

कापूस-
हलकी कोळपणी करणे: जमिनीला भेगा पडू नयेत आणि जमिनीतील ओलावा उडून जाऊ नये म्हणून वरचेवर हलकी कोळपणी (डवरणी) करावी. यामुळे जमिनीच्या भेगा बुजतात व बाष्पीभवन थांबते.
नत्रयुक्त खतांचा वापर टाळणे: पाऊस नसताना जमिनीमध्ये रासायनिक नत्रयुक्त खते (उदा. युरिया) देणे टाळावे, कारण यामुळे पिके सुकू शकतात. संरक्षित सिंचन: ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध आहे, त्यांनी ठिबक किंवा तुषार (स्प्रिंकलर) सिंचनाचा वापर करून पिकांना हलके पाणी द्यावे. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
पिकाला ताण सहन करण्याची शक्ती मिळण्यासाठी १% पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) ची फवारणी करावी.
पाती व बोंड गळ थांबवणे: पाण्याच्या ताणामुळे होणारी पाती आणि बोंड गळ रोखण्यासाठी 'नॅप्थील ॲसेटिक ॲसिड' (NAA - प्लॅनोफिक्स) ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मॅग्नेशियम आणि बोरॉन: कपाशी लाल पडू नये म्हणून १% मॅग्नेशियम सल्फेट आणि ०.२% बोरॉनची फवारणी फायदेशीर ठरते.
कोरड्या व उष्ण हवामानात रसशोषक किडींचा (मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढरी माशी) प्रादुर्भाव वेगाने वाढतो. किडींच्या आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून सुरुवातीला निंबोळी अर्क (५%) ची फवारणी करावी. पिवळे चिकट सापळे २५ प्रती हेक्टर प्रमाणे लावावेत. गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी निळा प्रकाश सापळा १ प्रती एकर प्रमाणे लावावा.

तूर पिक-
आच्छादन (Mulching): पिकाच्या ओळींमध्ये सुके गवत, काडीकचरा किंवा सोयाबीनचे भुसे पसरावे, ज्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो पाने गुंडाळणारी अळी: उपाय: प्रादुर्भाव झालेली पाने अळीसह तोडून नष्ट करावीत आणि क्विनॉलफॉस (२५ EC) २ मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेंगा पोखरणारी अळी (घाटी अळी / हेलिओथिस) पीक फुलोऱ्यात आल्यावर शेतात प्रति एकरी ५ ते ६ कामगंध सापळे (Pheromone Traps) लावावेत. शेतात पक्षी बसण्यासाठी 'T' आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टिन बेंझोएट (५ SG) ५ ग्रॅम किंवा क्लो्रएन्ट्रानिलीप्रोल (कोराजन १८.५ SC) ३ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

मर रोग (Wilt):नुकसान: रोगट झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर नेऊन जाळून टाकावीत. झाडाच्या मुळाशी ट्रायकोडर्मा व्हिरीडी (बुरशीनाशक) ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी (Drenching) करावी.
वांझ रोग (Sterility Mosaic): रोगट झाडे सुरुवातीलाच उपटून नष्ट करावीत. हा रोग पसरवणाऱ्या कोळी किडीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपाथ्रीन (३० EC) ५ मिली किंवा डायकोफोल (१८.५ EC) २५ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

सोयाबीन-
संरक्षित पाणी: जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल, तर फुलोरा अवस्था (पेरणीनंतर ३५-४५ दिवस) आणि शेंगा भरण्याची अवस्था (पेरणीनंतर ६०-७० दिवस) या दोन संवेदनशील टप्प्यांवर स्प्रिंकलर (तुषार सिंचन) किंवा सऱ्यांमधून पाणी नक्की द्यावे.
पाण्याचा ताण सहन करण्यासाठी: १% पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) (१०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात) किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी.
शेंगा भरण्यासाठी: शेंगा भरण्याच्या अवस्थेत ००:५२:३४ (१०० ग्रॅम) सोबत बोरॉन (२० ग्रॅम) प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास दाण्यांचा आकार आणि वजन वाढते.
पाने खाणारी अळी (लष्करी अळी / तंबाखूवरील अळी): सुरुवातीला ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टिन बेंझोएट (५ SG) ४ ते ५ ग्रॅम किंवा क्लो्रएन्ट्रानिलीप्रोल (कोराजन) ३ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply