Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात

तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची !

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितला संघर्षातून यशाचा मंत्र l राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा

संगमनेर । वीरभूमी - Sep 28, 2026 • 11:06 PM 10 views
तुमच्यासाठी एमपीएससी-यूपीएससीची परीक्षा आहे, तर आमच्यासाठी निवडणुकीची परीक्षा आहे. तुम्ही एकदा अपयश स्वीकारून पुन्हा यश मिळवले, तसेच मीही लोकसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने तुमच्यासमोर उभा आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो. मात्र, सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील मुलांनी शिक्षणाच्या बळावर शासकीय सेवेत स्थान मिळवणे, यापेक्षा आनंदाचा दिवस माझ्या जीवनात दुसरा कुठलाही नाही,” असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील भगवतीमाळ-खंदरमळा येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमास आमदार अमोल भाऊ खताळ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र टाइम्सचे पुणे उपसंपादक प्रशांत काशिनाथ आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन जनार्दन आहेर यांनी केले. तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सामान्य कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेऊन चांगल्या पदावर पोहोचते, तेव्हा त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी उपस्थित राहणे मला नेहमीच आनंदाचे वाटते. कारण स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष हा सोपा प्रवास नसतो.

आज संघर्ष करून अधिकारी झालेली हीच मुले उद्या मोठ्या पदांवर पोहोचतील. आपल्या गावातील एखादा व्यक्ती मोठ्या पदावर गेल्यानंतर त्याचा फायदा केवळ त्याच्या कुटुंबाला होत नाही, तर संपूर्ण गावाला आणि समाजाला होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.

गावाच्या विकासाच्या मागण्यांसोबतच शाळांच्या पायाभूत सुविधांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. शाळांच्या खोल्या, संगणक, डिजिटल बोर्ड, मुलींसाठी स्वच्छतागृहे आणि शुद्ध पाण्याची सुविधा या मूलभूत गरजा असून त्याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. जोपर्यंत आपण आपल्या मुलांचा पाया मजबूत करत नाही, तोपर्यंत त्यांना उज्ज्वल भविष्य देता येणार नाही. त्यामुळे कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे आणि ती सुरुवात करण्याचा निर्णय आपण घेतला आहे,” असे ते म्हणाले.संगमनेर तालुक्यातील शाळांच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या पदांवर पोहोचू शकतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“आपली मुलं शिकवा, मुलींना शिकवा आणि त्यांना समान संधी द्या. तुमची मुलं जेव्हा मोठी होतील, तेव्हा तुम्हाला गावातील कोणत्याही पदापेक्षा अधिक सन्मान मिळेल. सरपंच एकच होणार, आमदार एकच होणार, खासदारही एकच होणार; मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणातून निर्माण होणारे यश अनेक पिढ्यांना पुढे नेते,” असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

राजकीय स्पर्धेपेक्षा कुटुंब, मुलांचे शिक्षण आणि आई-वडिलांचे कल्याण यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करताना त्यांनी राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नये, असेही स्पष्ट केले. आपल्या मुलाबाळांच्या विकासासाठी आणि आई-वडिलांच्या कल्याणासाठी प्रथम काम करा,” असे ते म्हणाले.

यावेळी आमदार अमोल भाऊ खताळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमधील यश एका दिवसात मिळत नसून त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि अपयशातून शिकण्याची तयारी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशावर समाधान न मानता पुढील ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्नशील राहावे. आपल्या यशातून कुटुंबासोबतच गावाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यातील भूमिकेवर भाष्य करताना डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, आज संघर्ष करून अधिकारी झालेली हीच मुले भविष्यात मोठ्या पदांवर पोहोचतील. त्यावेळी आपल्या गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी ते आपल्या परीने योगदान देतील.आपला माणूस कुठेतरी मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर त्याचा फायदा संपूर्ण गावाला होतो. आपण कितीही मोठे लोकप्रतिनिधी झालो, तरी अनेक विकासकामांना प्रशासकीय स्तरावरील निर्णयांची आवश्यकता असते. त्यामुळे भविष्यात आपल्या तालुक्याच्या विकासाची योजना एखाद्या अधिकाऱ्यापुढे आली आणि त्याने ‘हा माझा तालुका आहे’ या भावनेतून ती पुढे नेली, तर त्याचा फायदा संपूर्ण परिसराला होईल,” असे त्यांनी नमूद केले.

परिसरातील सबस्टेशनच्या प्रश्नावरही डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “मला खोटे आश्वासन देता येत नाही. ‘करू’, ‘पाहू’, ‘उद्या या’, ‘परवा या’ हा माझा स्वभाव नाही. जे शक्य आहे त्याला ‘हो’ आणि जे शक्य नाही त्याला स्पष्ट ‘नाही’ सांगणे, हीच माझी कार्यपद्धती आहे,” असे त्यांनी सांगितले.एकदा ‘हो’ म्हटल्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे ही माझी भूमिका आहे. सबस्टेशनचा प्रश्न एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द मी आमदार अमोल खताळ यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुम्हाला देतो,” असे डॉ. विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमात एमपीएससी, विविध स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या यशामुळे भगवतीमाळ-खंदरमळा आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमास भगवतीमाळ-खंदरमळा तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply