Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कर्जत तालुक्यातील या 12 दुकानांवर प्रशासनाची कारवाई

कोविड सुसंगत वर्तवणुकीचे पालन होत नसल्याचा ठपका

कर्जत । वीरभूमी- Jul 31, 2021 • 12:00 AM 1895 views
कोविड सुसंगत वर्तवणुकीचे पालन होत नसल्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी रस्त्यावर उतरत दुपारी चारनंतर कर्जत शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या 12 दुकानावर कारवाई करीत पुढील आदेश होईपर्यंत सील करण्यात आले आहे.

यामध्ये कर्जत शहरातील जगदंबा कलेक्शन, हॉटेल फिरोज, निलायम मेन्स पार्लर. राशीनमधील दीपक मेन्स पार्लर, दत्त कुशन, संतोष केशभूषा, आशीर्वाद कापड दुकान, प्रिया जनरल स्टोअर्स. माहीजळगाव येथील जाधव किराणा, हॉटेल साइसेवा, पांडुरंग बेकर्स व मिरजगाव येथील सुविधा बेकर्स अशा 12 दुकांनाचा समावेश आहे.

कर्जत शहर आणि तालुक्यातील सर्व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत या वेळेत सुरू असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले असता शुक्रवार, दि. 30 रोजी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी 3 पथके तयार करीत वरील नियमांचे उल्लंघन करणारे आस्थापना यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

यावेळी सदर पथकास कर्जत शहर आणि तालुक्यातील राशीन, मिरजगाव, माहीजळगाव 12 आस्थापना दुपारी चारनंतर खुली तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार कोविड सुसंगत वर्तवणुकीचे पालन करीत नसल्याचे आढळले. यावेळी तिन्ही पथकाने त्यावर कारवाई करीत त्यांना पुढील आदेश होईपर्यंत सील करण्यात येत असल्याचे स्पष्ट बजावले आहे.

या पथकात स्वतः प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, सहायक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह महसुल, पोलीस कर्मचारी, नगरपंचायत विभाग, ग्रामसेवक सहभागी झाले होते.

यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी शासनाने आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेले कोरोना विषयक नियम पुरेपूर पाळत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यासह कर्जत शहर आणि तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी असणार्‍या मंगल कार्यालयात होणारे विविध लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरिता पोलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे.

तसेच या समारंभप्रसंगी कोव्हीड सुसंगत वर्तवणुकीचे पालन होत नसल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. विनापरवानगी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम घेतल्यास संबंधित मंगल कार्यालय यांच्यावर दंडात्मक तसेच सीलबंद करण्याची कारवाई प्रशासन पार पडेल याची नोंद घ्यावी असे प्रसिद्धपत्रक जाहीर केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply