Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ग्रामपंचायतीच्या जागेवरील पक्के बांधकाम काढून घ्या

पाथर्डी तालुक्यातील या ग्रामपंचायतीने गाळेधारकांना बजावल्या नोटीसा

करंजी । वीरभूमी- Aug 08, 2021 • 12:00 AM 4503 views
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ग्रामपंचायतीच्या जागेवर विना परवाना पक्के बांधकाम (Unlicensed pucca construction) केल्याच्या कारणावरून 17 गाळेधारकांना ग्रामपंचायतीने नोटीसा बजावल्या आहेत. (The Gram Panchayat has issued notices to the squatters.) यामुळे अवैध बांधकाम करणार्‍या गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, सन- 2012 साली तिसगाव ग्रामपंचायतीने गट नंबर 296 मध्ये 17 व्यावसायिकांना तात्पुरते पत्र्याचे शेड उभारूण व्यावसायासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी काही व्यापार्‍यांनी ग्रामपंचायतीने घालून दिलेले नियम व अटी धाब्यावर बसवत पत्र्याचे शेड बाजूला करत त्या ठिकाणी पक्के बांधकाम केले.

यामुळे काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यावरुन ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी यासर्व बांधकामाची पाहणी केली.

या पहाणीमध्ये अनेकांनी ग्रामपंचायतच्या जागेत पक्के बांधकाम करून भाडेपट्टाच्या कराराचा व शर्तीचा भंग केला. तसेच पक्के बांधकाम केल्याची व अधिकची जागा बळकावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लक्षात आले. यामुळे ग्रामपंचायतने वकीलामार्फत अशा 17 गाळेधारकांना नोटीसा बजावून आठ दिवसात पक्के बांधकाम काढून घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

या नोटीसा अ‍ॅड. सी. एन. सातपुते यांच्या मार्फत पाठविण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतची बळकावलेली जागा मोकळी करून देण्यात यावी अन्यथा दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा नोटीसीद्वारे दिला आहे.

या नोटीसांमुळे ग्रामपंचायत जागेवर अवैध बांधकाम करणार्‍या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता हे गाळेधारक आपले बांधकाम काढून घेत जागा मोकळी करून देणार की नाही? हे पहावे लागणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply