Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आ. राजळेंच्या टीकेला ढाकणेंचे प्रत्युत्तर

आ. राजळे यांचे नाव न घेता केली टीका

पाथर्डी । वीरभूमी- Aug 11, 2021 • 12:00 AM 3458 views
आमच्या कारखाना लगतचा आम्हीच केलेला रस्ता दाखवण्याऐवजी, तुमच्या कारखान्याजवळ तुमच्या गावात जाणारा रस्ता आम्हाला दाखवा.आम्ही सर्व पत्रकारांसह आमचे वाहन घेऊन येऊ. अकराशे कोटीचा निधी आणला म्हणता यातून स्वतःच्या गावाकडे जाणारे रस्ते देखील करता आले नाहीत.

एवढेच काय पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई तुमच्या गावात आहे. भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत नसतो. यासाठी गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते व टक्केवारीसाठी पोसलेले ठेकेदार दूर करून विकासकामे करावी लागतात. तसेच झोपणार्‍याला उठवता येते, मात्र तुम्ही झोपेचं सोंग घेतले असल्याने आपणाला झोपेतून उठवणे अशक्य आहे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषिकेश ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली.

दोन दिवसापूर्वी झालेल्या जाहीर कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्यावर कुंभकर्णाप्रमाणे साडेचार वर्षे झोप घेतल्याचा आरोप करत, माझ्या वाहनात बसा मी केलेली विकास कामे तुम्हाला दाखवते अशी जहरी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज पक्षाच्या कार्यालयामध्ये संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक राष्ट्रवादीचे युवक नेते ऋषिकेश ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेत आ. राजळेंना प्रतिउत्तर दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक चंद्रकांत भापकर, योगेश रासने, देवा पवार, अक्रम आतार आदी उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले की, आम्ही कोविड सेंटर सुरू केले. तेही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याची कुठेही जाहिरातबाजी केली नाही. तुम्ही मात्र कोविड सेंटरला डस्टबिन दिले त्यावर स्वतःचा फोटो चिटकवला. आमच्या कारखान्या लगतचा रस्ता सुरुवातीला माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी मंजूर करून घेतला. त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी त्यावर खडीकरण केले.

येथील दोन गावांनी रस्ता नसल्यामुळे तुमच्या काळामध्ये मतदानावर बहिष्कार टाकला. मात्र अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून त्यासाठी निधी मिळवला. तुमच्या आमदार निधीतून हा रस्ता झालेला नाही. विकास करायचा असेल तर तुमच्या कारखान्याकडे जाणार्‍या रस्त्याचा करा. आमच्या कारखान्याची एवढी काळजी असेल तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून आमच्या कारखान्याला कर्ज न मिळावे, यासाठी डावपेच करून आम्हाला नेहमी त्रास दिला. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील माहेरच्या कारखान्याला कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले.

तुमच्या गावात पिण्याचे शुद्ध व नियमित नागरिकांना पिण्याचे पाणी द्या. पंचायत समितीमध्ये टँकरचा भ्रष्टाचार होऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील कोणाच्या दबावामुळे गुन्हे दाखल होत नाहीत यावरूनच टँकर घोटाळे करणारे कोण हे लक्षात येते. खुले नाट्यगृहाच्या विकासाच्या नावाखाली जिल्हा परिषदेची शाळा निर्लेखन व परवानगीविना पाडली. एकीकडे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने मते मिळवायची, दुसरीकडे त्यांच्या नावाने नगरपालिकेच्या जागेत उभारलेल्या वाचनालयाची इमारत बळकावण्यासाठी स्वतःच्या फाउंडेशनकडे वाचनालय चालवायला घेतले. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते वापराविना धूळ खात पडून आहे.

व्यापार्‍यांना विश्वासात न घेता खरेदी-विक्री संघाची इमारत पाडली.तेथील व्यावसायिकांना रस्त्यावर आणले. नगरपालिकेच्या कारभारात तर प्रचंड घोटाळा आहे. काम छोटे आणि बिल मोठे पाच वर्षापासून पालिकेच्या मालकीचा जेसीबी नगराध्यक्ष प्रमाणेच गायब झाला आहे. विकासकामांच्या बढाया मारणार्‍या आमदारांनी जॉगिंग ट्रॅक येथे साडेचार कोटींचे काय काम केले हे दाखवावे.

स्वतःच्या कारखान्यावर तीन टनाच्या बैलगाडीचे वजन अडीच होते. 500 किलो ऊस जातो कुठे? याचा हिशोब सुद्धा त्यांनी द्यावा. यामुळे फक्त भूमीपुजनाचे नारळ फोडणार्‍या आमदारांनी मतदार संघातल्या नागरिकांप्रमाणे संत भगवान बाबांच्या गड व परिसराला देखील फसवले आहे.

तुम्ही अकराशे कोटी रुपयांच्या विकास कामाची यादी सोबत घ्या.ती कामे पाहण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत येण्यास तयार आहोत. खरोखर काम झाली असतील तर पाथर्डीतील मुख्य चौकांमध्ये त्यांचा राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर सत्कार करू, असे यावेळी ढाकणे म्हणाले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply