Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

व्यावसायिकांना काही अटीवर ‘स्वातंत्र्य’

राज्य शासनाकडून निर्बंधात शिथीलता । काय सुरू काय बंद वाचा

मुंबई । वीरभूमी- Aug 12, 2021 • 12:00 AM 2082 views
स्वातंत्र्य दिनापासून (रविवार दि. 15 ऑगस्टपासून) (Since Independence Day) राज्यातील दुकाने, उपहारगृह, मॉल रात्री 10 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे (Shops, restaurants and malls in the state are allowed to remain open till 10 pm). मात्र दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लसीरकण बंधनकारक करण्यात आले आहे. तर राज्यातील धार्मिक स्थळे, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स मात्र बंद राहणार आहे (Religious places, cinemas and multiplexes in the state will remain closed).

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांना 700 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज पडल्यास तात्काळ कडक लॉकडाऊन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिकांना निर्बंधाचे स्वातंत्र मिळाले असले तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागणार्‍या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

आज झालेल्या बैठकीत राज्यातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील सर्व दुकाने, मॉल, उपहारगृहे यांची वेळ वाढवून रात्री 10 पर्यंत करण्यात आली आहे. मात्र यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत.

उपहारगृहामध्ये क्षमतेच्या 50 टक्के आसन व जेवण मिळेपर्यंत मास्क वापरावा लागणार आहे. दुकाने उघडी ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकानदार व तेथे काम करणारे यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. तसेच दुसरा डोस होऊन 14 दिवसाचा कालावधी झालेला असावा.

मॉलसाठीही वरील नियम करण्यात आला असून मॉलमध्ये येणार्‍या ग्राहकालाही लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक केले आहे. विवाह सोहळ्यांना खुल्या जागेत 200 तर बंदिस्त जागेत 100 जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच नियमाचे पालन होते की, नाही यासाठी तपासणीसाठी आलेल्या अधिकार्‍याला व्हिडीओ दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यातील धार्मिक स्थळे, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स हे बंदच असणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय व धार्मीक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रचार सभा, रॅली, मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र निर्बंध शिथील केल्यानंतर बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन हा 700 मेट्रिक टनापेक्षा जास्त लागत असल्यास संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

यामुळे नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, लसीकरणाचे दोन्ही डोस झाले नसतील तर ते पुर्ण करावेत. नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असा आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply