Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

त्या माय-लेकराच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

ठाकुर पिंपळगाव येथील घटना

शेवगाव । वीरभूमी- Aug 12, 2021 • 12:00 AM 1794 views
दोन दिवसापुर्वी शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या पाण्यात माय-लेकराचे मृतदेह आढळले होते. ही आत्महत्या आहे की, हत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर पोलिसांनी मयताच्या पतीसह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मयत महिलेची आई चंद्रकला नवनाथ जगदाळे (रा. सुकळी खुर्द, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. यावरुन अंबादास अशोक सोनवणे (वय-40) व सुवर्णा अशोक घोरपडे (वय-35, दोघेही रा. ठाकुर पिंपळगाव, ता. शेवगाव) या दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शेवगाव - गेवराई राज्य मार्गावरील ठाकुर पिंपळगाव येथील भागीरथी नदीच्या पुलाखालील सिमेंटच्या पाईपमध्ये ज्योती अंबादास सोनवणे व दीपक अंबादास सोनवणे या दोघा मायलेकरांचे मृतदेह सोमवारी आढळले होते. मायलेकरांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. याबाबत तर्तवितर्क केले जात होते. मात्र मयत महिलेची मुलगी प्रियंका सोनवणे हिने दिलेल्या माहितीवरुन ज्योती व दीपक सोनवणे हे माय लेकरं पती अंबादास सोनवणे व सुवर्णा अशोक घोरपडे या महिलेसह रविवार दि. रोजी दुपारच्या वेळी घरामधून बाहेर गेले होते. मात्र सायंकाळी अंबादास सोनवणे हा एकटाच घरी आला. त्यानंतर पत्नी व मुलाचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यानंतर पत्नी व मुलगा हरवला असल्याची खबर बोधेगाव पोलीस चौकीत दिली.

दरम्यान रविवारी झालेल्या पावसामुळे भागीरथी नदीस आलेल्या पाण्यात त्यांचे मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आले होते. सदर मयत महिलेचा पती रविवार पासून गायब असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

मयत महिलेची मुलगी प्रियंका हीने पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन घरामध्ये पती-पत्नीचे एका महिलेवरुन सतत वाद होत असल्याचे सांगितले. त्यानुसार ज्योतीची आई चंद्रकला जगदाळे यांच्या फिर्यादीनुसार पती आंबादास सोनवणे व सुवर्णा घोरपडे या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

त्यातील अंबादास सोनवणे यास पोलिसांनी पैठक तालुक्यातील बिडकीन येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि. विश्वास पावरा हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply