Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत थोडीसी घट

संगमनेर, पारनेरची चिंता कायम । अकोलेचा आकडाही शंभरी पार

अहमदनगर । वीरभूमी- Aug 14, 2021 • 12:00 AM 1711 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने शुक्रवारी उच्चांक केल्यानंतर आज शनिवारी जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट झाली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 953 कोरोना बाधित आढळले.

गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी कमी जास्त होत असतांना काल शुक्रवारी यामध्ये वाढ झाली होती. यामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आज शनिवारी यामध्ये थोडी घट झाली आहे. मात्र हा आकडा जास्त असल्याने चिंता कायम आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नेहमीप्रमाणे संगमनेर टॉपवर असून शुक्रवारच्या तुलनेत आजच्या आकड्यामध्ये घट झाली आहे. मात्र अकोले तालुक्याची आकडेवारीत वाढ झाल्याने दुसर्‍या स्थानावर आला आहे. पारनेर तिसर्‍या क्रमांकावर असून शुक्रवारच्या तुलनेत आज आकडेवारी घटली आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 132, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 438 तर अँटीजेन चाचणीत 383 असे 953 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 144, अकोले 122, पारनेर 121, नगर ग्रामीण 81, शेवगाव 80, कर्जत 77, राहुरी 47, नगर शहर 45, राहाता 43, नेवासा 41, श्रीगोंदा 37, पाथर्डी 26, जामखेड 26, कोपरगाव 25, इतर जिल्हा 23, श्रीरामपूर 13, भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply