Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचा गौरव

महापूरग्रस्त चिपळूणमधील ऐतिहासिक कामगिरी बद्दल सन्मान

राजा माने । वीरभूमी- Aug 16, 2021 • 12:00 AM 725 views
मुंबई ः ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी महापूरग्रस्त चिपळूण शहराला कचरा, चिखल आणि आऱोग्याच्या असंख्य समस्यांतून मुक्ती देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. यानिमित्त अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी गौरव करण्यात आला.

महापुराच्या संकटाने चिपळूण अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. चिखल, कचरा आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराईचे स़ंकट गावावर घोंगावत होते. यासंकटातून चिपळूणला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र मदतीला धावला होता.

अशा परिस्थितीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विपिन शर्मा यांनी तातडीने बैठक घेतली. मंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडे तेथील आपत्ती व्यवस्थापनाची मोहीम मोठ्या विश्वासाने सोपविली.

हेरवाडे यांनीही जिद्द, व्यवस्थापन कौशल्य आणि टीमवर्कच्या बळावर पूरग्रस्त चिपळूण शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ऐतिहासिक कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. तब्बल 25 हजार टन चिखल, कचरा काढून शहर पूर्वपदावर आणण्यासाठी कष्ट उपसले. नानासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी प्रतिष्ठान, नाणिज संस्थान, संत निरंकारी मंडळ, असंख्य स्वयंसेवी संस्थां आणि चिपळूण, नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या सुमारे आठशे कर्मचार्‍यांच्या कामाचे नियोजन आणि समन्वय मोठ्या खुबीने साधला.

अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केलेल्या या कार्याचा गौरव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार व सन्मानपत्र देवून करण्यात आला. हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने ठाणे जिल्हा नियोजन भवनात हा सोहळा पार पडला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply